मुंबई : मनसे नेते राज ठाकरे नेहमीच आपले शब्द अगदी प्रांजळपणे बोलतात. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारवर सातत्याने निशाणा साधणाऱ्या राज ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात. महाराष्ट्र सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
तलवार उगारली
वास्तविक राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर सभेत तलवार उगारली होती. याआधी मोहित कंबोज, अस्लम शेख, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा अल्टिमेटम राज्य सरकारला देण्यात आला होता
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्यास सांगितले आहे. मनसे समर्थकांच्या मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, जर लाऊडस्पीकर काढले नाहीत तर त्यांच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते मशिदींसमोर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात करतील.
राज ठाकरे यांनी मंगळवारच्या मेळाव्यात ‘राज्य सरकारने कारवाई न केल्यास आणि सर्व लाऊडस्पीकर काढले नाही तर पुढील कारवाईसाठी त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला जबाबदार धरू नये’, असे सांगितले.
मशिदींमधील लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजावरून राज ठाकरे सातत्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल करत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे शिवसेनेवर निशाणा साधत आहेत.
आम्हाला हिंदुत्वाचे ज्ञान कोणी देऊ नये : शिवसेना
दरम्यान, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्हाला कोणीही ज्ञान देण्याची गरज नाही, असे राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.