जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील २८ वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो व संदेश तरुणीच्या व तिच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवून तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी शनिवार दि.९ एप्रिल रोजी मोबाईलधारकाविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणी आपल्या कुटूंबियांसह जळगाव येथे वास्तव्यास आहे. या तरुणीला २६ मार्चपासून एक व्यक्ती सोशल मीडियावर तिचेच अश्लील फोटो व संदेश पाठवत आहे. संबधिताने चोरुन हे फोटो काढल्याचा संशय आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याने शेवटी तरुणीने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास लिलाधर कानडे करीत आहेत.