.यावल- येती विधानसभा निवडणूक व दि.11 रोजी होणारे गावातील दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस प्रशासनाच्या वतीने दि.6 रोजी संपूर्ण गावातून भव्य पथसंचालन काढण्यात आले होते. यावेळी या पथसंचलनात फैजपूर येथील पोलिस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, यावल चे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांचेसह मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तसेच सुरक्षा दलातील कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी सहभागी झालेले होते.
हे पथसंचलन गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आले. येती विधानसभा निवडणूक व देवी विसर्जन मिरवणूक तसेच सणासुदीच्या काळात गावात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि गुन्हेगारीवर वचक बसावा. यादृष्टीने या पथसंचलनात फार महत्त्व आहे. दरम्यान दि.5 रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सुद्धा गावास भेट देऊन गावातील मुख्य चौक भाग परिसराची व परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच दुर्गा विसर्जन मार्गाची पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी हजर होते. गावात फार मोठ्या पोलीस प्रशासनाचा फौजफाटा पाहून ग्रामस्थांमध्ये तर्क -वितर्कांना उधाण आले होते.
सोबत फोटो पाठवीत आहे.