मुंबई : कोरोनाची रुग्ण संख्या नाहीसा झाल्यामुळे राज्यातील कोरोनचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र अजूनही राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस सुरु करण्यात आले नव्हते. मात्र आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे आता गेल्या दोन वर्षांपासून ओस पडलेले युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार आहेत.
सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि त्या अंतर्गत येणारे कॉलेजेस आणि विद्यापीठं बंद होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला असून नियमही हटवण्यात आले आहेत. म्हणूनच आता सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत.
उदय सामंत यांनी राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालय ऑफलाईन सुरु राहणार या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना पाळून राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालय पुन्हा सुरु करावीत असा निर्णय घेण्यात आला आहे.