मुंबई : ईडीने शिवसेना खासदार संजय राऊतांची मुंबई व अलिबागमधील संपत्ती जप्त केली. ईडीच्या या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक झाले असून किरीट सोमय्या यांच्यावर माइकसमोर शिवीगाळ केली. हा येड XX आहे… असे शब्द वापरत, मी हे ऑनरेकॉर्ड बोलतोय अशा शब्दात राऊत यांनी ठणकावून सांगितले.
लाखो मुंबईकरांच्या राष्ट्र भावनेशी सोमय्या यांनी खेळ केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संरक्षण खात्याच्या आयएनएस विक्रांत या जहाजासाठी किरीट सोमय्या यांनी जवळपास 57 कोटी रुपये गोळा केले, मात्र ते स्वतःच्या घशात घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. यापूर्वीदेखील भर पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा पोत खालच्या पातळीवर घसरल्याची टीका सर्व स्तरांतून केली गेली होती.
काय म्हणाले संजय राऊत
“हा येड XX आहे. ही कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. ही कीड संजय राऊत संपवणार. ही कीड शिवसेना संपवणार. पराक्रम काय सांगतो मला? हे सगळे महाराष्ट्रद्रोही… आता देशद्रोही. आयएनएस विक्रांतच्या नावावर तुम्ही जनतेकडून पैसे गोळा करता? कोट्यावधी रुपये…. आम्ही तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणताय? हा देशद्रोह आहे, देशभावनेशी खेळण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाने केला आहे”. असे बोलत संजय राऊतयांनी थेट टीका केली आहे.