जळगांव,(प्रतिनिधी)- शहरातील पिंप्राळा येथील प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारक चा विषय गेल्या 23 वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी आम्ही गेल्या 14 वर्ष पासून सातत्याने पाठपुरावा करून शासनाचे व सत्ताधारी यांचे लक्ष वेधत आहे. परंतु मनपा प्रशासन व सत्ताधारी या विषय गांभीर्याने घेत नाही, निव्वळ पोकळ आश्वासन दिलं जातं आहे. परंतु अद्याप पर्यत मनपा ने जागा नावावर लावली नाही…प्रतिकृती दीक्षाभूमी चे अंदाजपत्रक तयार केले नाही. मनपा प्रशासन व सत्ताधारी आमची दिशाभूल करीत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. मनपा प्रशासनाने व सत्ताधारी यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा व प्रतिकृती दीक्षाभूमी चे 50 कोटीचे अंदाजपत्रक तयार करून गट नंबर 220 ची मनपा मालकीची असणारी जागा प्रतिकृती दीक्षाभूमी साठी राखीव करण्यात यावी. यासाठी आपल्याला जनआंदोलन उभे करावे लागणार असून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केले आहे.