मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा
गुढीपाडव्यानिमित्त ट्वीट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले आहेत की, ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो.
आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. pic.twitter.com/E0ocwJ3czA
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केली आहे. ट्विटर युजर्सनी त्यांनाही आजच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरं केलं जातं. काही भागात आजपासून नवरात्र उत्सव देखील साजरा केला जातो. मोदींनी याबाबत देखील सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. गोष्टी च्या नागरिकांना गेली दोन वर्ष अनुभवता आल्या नव्हत्या त्या करताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे.