नागपूर : राज्यात ईडीकडून होत असलेल्या कारवाया सुरूच आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील अॅड. सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळपासून उके यांच्या घरी ईडी ची छापेमारी सुरु होती. अखेर तब्बल 5 तासांच्या चौकशी नंतर ईडी ने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश उके हे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टरविरोधक समजले जातात. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता सतीश उके यांना चौकशी नंतर सोडून देणार की त्यांना अटक होणार हे पाहावे लागेल
सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडी ने ताब्यात घेतले आहे. सतीश उके यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी जवळीक आहे अस म्हंटल जाते. फोन टॅपिंग प्रकरणात उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक याचिका दाखल केल्यानंतर ते चर्चेत आले होते.
हे पण वाचा :
कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ महत्त्वाचे काम आजच पूर्ण करा, बंपर लाभ मिळण्याची संधी
आता राज्यावर नवीन संकट घोंगावताय, काय आहे
धक्कादायक ! एक्सप्रेसच्या खिडकीला तरुणाने घेतला गळफास, नांदेड स्थानकावरील घटना
काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने केलेली कारवाई ही त्याच अनुषंगाने केली गेली अशी चर्चा सुरू आहे.