जळगाव : राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी टोला लगावला आहे. दानवे हे फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा टोलाही खडसे यांनी दानवेंनी लगावला आहे.
भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात. चंद्रकांत दादांनी, तर अनेक तारखा दिल्या. मात्र, त्या तारखा मागे गेल्या, अशी टीका खडसेंनी पाटील यांच्यावर केली.
सरकारमधील कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही.रावसाहेब दानवे हे फक्त स्वप्न पहात आहेत.खरे तर आता कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही. त्यामुळे दानवे यांनी नुसते हवेत तीर सोडू नये, असेही खडसे म्हणाले.खडसे यांच्या टीकेला भाजप काय प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.