राज्यात अवैध वाळू उपसा सुरु असल्याच्या अनेक घटना समोर येतं असतांना महसूल प्रशासन देखील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दरम्यान वाळू माफियांविरुद्ध कारवाई करतांना प्रशासनाला बऱ्याचदा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते अनेकदा नदी पत्रातील पळून जाणाऱ्या वाहनाच्या पाठीमागे गाडी लावून पाठलाग करावी लागते, जीवाची पर्वा न करता महसूल कर्मचारी कर्तव्य बजावत असतो असंच कर्तव्य बजावतांना बीड तहसीलदारचे पथक मध्यरात्री वाळू उपसा सुरू आहे की नाही बघण्यासाठी गेले असता शनिवार दिनांक ५ मार्च रोजी रात्री सावळेश्वरजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला यात मंडळअधिकारी यांचा जागीच मृत्यू झाला तर तहसीलदार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सविस्तर असे की,गोदापात्रात रात्रीचा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक गोदापात्रातील गावावर नेहमीच गस्त घालत असतात. असेच एक बीड तहसीलदारचे पथक मध्यरात्री वाळू उपसा सुरू आहे की नाही बघण्यासाठी गेले असता सावळेश्वरजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव जागीच ठार झाले तर तहसीलदार सूर्यकांत डोके गंभीर जखमी झाले.
बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपशामुळे अनेक निरपराध जीव गमवावे लागले आहेत असाच एक धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडला, चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेवराई तालुक्यातील गोदापात्रातील गावाकडे लक्ष ठेवण्यासाठी बीड तहसीलचे एक पथक मध्यरात्री गेले होते, गेवराई तालुक्यातून परत निघत असताना सावळेश्वर फाट्याजवळ पथकाच्या गाडीचे नियंत्रण सुटले अन् गाडी भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला झाडावर जावून धडकली. या भीषण अपघातात बीडचे नायब तहसीलदार नितीन जाधव (वय – 40) यांचा जागीच मृत्यू झाला तर तहसीलदार सूर्यकांत डोके गंभीर जखमी झाले. डोके यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.