मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना इडीने अटक केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिक यांच्यावर कारवाई करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. उद्धवजींनी ठाम भूमिका घेतल्यास भाजप 100 % शिवसेनेला समर्थन देईल असे मोठे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे.
आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताठमानेने उभं राहावं. त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. मुख्यमंत्र्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत की, दाऊद, दाऊदचे हस्तक, दाऊदच्या गँगमधली लोक आणि त्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या नवाब मलिकांसारख्या सगळ्या लोकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
हे देखील वाचा :
सुसाईट नोट लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची आत्महत्या
नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय नौदलात ‘या’ पदांवर निघाली भरती, लगेचच करा अर्ज
आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये झाली मोठी वाढ, जाणून घ्या
वाढत्या महागाईचा आणखी एक झटका, अमूलचे दूध इतके महागले
आता प्रवासाचा खर्च होणार कमी, रेल्वेने पुन्हा सुरू केली ‘ही’ विशेष सुविधा
महाविकासआघाडीतील तीन पक्षांपैकी दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा केवळ उद्धव ठाकरे यांच्याकडूनच आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतल्यास भाजप त्याला पूर्णपणे पाठिंबा देईल, असे आशिष शेलार यांनी जाहीर केले.