पुणे महानगरपालिका मध्ये चौथी उत्तीर्ण उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. मुलाणी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख o2 मार्च 2022 असणार आहे.
एकूण जागा 11
पदाचे नाव : मुलाणी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतु शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना मुलाणी कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 17,205/- रुपये प्रतिमहिना इतका पगार देण्यात येणार आहे.
काही महत्त्वाच्या सुचना
ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजेच केवळ एक वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.
उमेदवारांना छोटी आणि मोठी दोनही जनावरे कापण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो,
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -05
अर्ज कारण्याची शेवटची तारीख – o2 मार्च 2022