भारतात केंद्र सरकारने पहिल्या फेरीत ५९ ऍप सह चीनच्या जवळपास २२४ ऍप वर बंदी घातली असून यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer, यांसारख्या लोकप्रिय ऍप चा समावेश आहे.
देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण करणाऱ्या 54 चिनी ऍप वर बंदी घालण्यासाठी भारत सरकार नवीन आदेश जारी करण्याची शक्यता आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सोमवारी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारचा असा विश्वास आहे की या 54 चिनी ऍप्समुळे “भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे.
Govt of India to ban 54 Chinese apps that pose a threat to India’s security: Sources
— ANI (@ANI) February 14, 2022