मुंबई : तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यांवर (Srivalli Song) लोक जोरदार रील्स बनवत आहेत. श्रीवल्ली गाण्यानं सेलिब्रेटींपासून ते कॉमन मॅन सर्वांनाच वेड लावल असून खूपच लाेकप्रिय झालय.झालय. ‘श्रीवल्ली’ गाणं वेगवेगळ्या भाषेत सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. अशातच हे गाणं आता आगरी भाषेत गायले असून सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल होतं आहे.
https://youtu.be/wq-ni8wpzMQ
नुकतेच डच गायिका इमा हिस्टर हिने श्री वल्ली इंग्रजीमध्ये गायले असून ते चांगलच व्हायरल झालय. आपण तेलुगू भाषेमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाची गाणी ही मल्याळम, तमिळ, हिंदी आणि मराठीतही करण्यात आली आणि खूप लोकप्रिय होत आहे.
दरम्यान श्रीवल्ली गाण्याच्या शब्दांमध्ये काहीसा बदल करून तोच सुरु, ताल ठेवत श्रीवल्ली गाणं आगरी भाषेत गायल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.