Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोल्हापूरच्या पाटलांची पुण्यात एंट्री

najarkaid by najarkaid
October 1, 2019
in राजकारण
0
कोल्हापूरच्या पाटलांची पुण्यात एंट्री
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे- पक्षाचे राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते आणि कोल्हापूरच्या मातीतील ’स्ट्राँग मराठा’ पहिलवानाला थेट पुण्यातील कोथरूडसारख्या सुरक्षित मतदारसंघात उतरवून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. पुणे जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात प्रदेशाध्यक्ष असलेल्या वरिष्ठ मंत्र्यांना उतरवून थेट शरद पवार यांनाही हे आव्हान देण्यात आले आहे, तसेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा केंद्रबिंदूही पुढील काळात चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोथरूडकडे सरकण्याची चिन्हे आहेत.
पाटील हे विधान परिषदेच्या पुणे पदवीधर संघाचे प्रातिनिधित्व करीत आहेत. गेल्या काही काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांनी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान वारंवार दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांना थेट पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणार्‍या पुणे जिल्ह्यातूनच विधानसभेत पाठविण्याची खेळी भाजपने खेळली आहे. राज्यातील महत्त्वाच्या मंत्रिपदासोबतच पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदही आहे. त्यामुळे राज्यासह पुण्याच्या भाजपच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदूही त्यांच्या रूपाने कोथरूडकडे सरकरण्याची शक्यता आहे. स्थानिक भाजपमधील समीकरणे त्यामुळे बदलणार आहेत. माजी पालकमंत्री आणि खासदार गिरीश बापट यांच्या शहरातील वर्चस्वाला हे आव्हान मानले जात असून, शहरात नवे नेतृत्व तयार करण्याचा पक्षाचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद देऊन पाटील यांना शहरात स्थिरावण्यासाठी वेळ दिल्यानंतर आता त्यांच्याकडे पुण्याचे संपूर्ण पालकत्त्व देण्यासाठीच कोथरूडसारखा मतदारसंघ देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कसबा पेठ मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्त्व करणार्‍या बापट यांनी नुकतीच लोकसभेची निवडणूक लढवून खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला. भाजपचे केवळ आमदारच नाही, तर शहराध्यक्ष आणि संघटनेतील इतर जबाबदार्‍या बापट यांनी सांभाळल्या होत्या. खासदार म्हणून केंद्र सरकारच्या विविध योजना शहरात राबविण्याकडे त्यांना अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यामुळे शहराची पूर्ण जबाबदारी विद्यमान पालकमंत्र्यांना पुन्हा देण्यासाठी त्यांच्याकरिता शहरातील सर्वांत ’सेफ’ मतदारसंघ शोधण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
मंत्रिपदाचाही विषय मिटला
माजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे राज्यातील अनेक महत्त्वाची खाती होती. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे शहरास मंत्रिपद नव्हते. आता पाटील पुण्यातून लढणार असल्याने विजय मिळविल्यानंतर साहजिकच त्यांच्याकडे यापुढेही राज्यातील महत्त्वाची खाती येण्याची शक्यता आहे. त्यांच्या रूपाने पुणे शहरास मंत्रिपद देण्याचाही प्रश्न भाजपच्या नेतृत्वाने निकालात काढला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझा आतला आवाज सांगतोय, यावेळी यश मिळेल: राज ठाकरे

Next Post

महायुतीवर शिक्कामोर्तब

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
महायुतीवर शिक्कामोर्तब

महायुतीवर शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us