मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील कंबर कसली आहे. याच पाश्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहे.
एप्रिलमध्ये निवडणुका ग्रहित धरुन कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या. आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी दिले आहेत. आपली स्वबळाची तयारी असली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाल्याचं कळतंय. मनसेच्या आगामी काळात विधानसभा निहाय बैठका आयोजित केल्या जातील. तर, लोकसभा निहाय बैठका राज ठाकरे घेणार आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि रणनिती संदर्भात मनसेची बैठक बोलावण्यात आली. मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड , ठाणे आणि नाशिक येथील पक्ष पदाधिकारी मुंबईतील बैठकीला उपस्थित होते.
हे देखील वाचा :
जाणून घ्या २०० रुपयांच्या बजेटमध्ये येणारे ‘हे’ शानदार प्लान्स
चेक पेमेंट सिस्टम बदलली ! जाणून घ्या अन्यथा तुमचा चेक परत केला जाईल
अरे बापरे..! जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा मृत्यू
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर
जळगाव जिल्ह्यात केळी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती ; जाणून घ्या
दरम्यान, काही दिवसापासून मनसे आणि भाजप युक्तीबाबतची चर्चा होती. मात्र, मनसे आणि भाजपची युती सध्यातरी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एमआयजी क्लबमध्ये सुरु असलेल्या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.