भिंड : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील सिंध नदीत शुक्रवारी सायंकाळी हिलगाव गावातील ग्रामस्थांनी भरलेली बोट बुडाली. दुर्घटनेवेळी नौकेत 12 जण होते. पोलिसांसह प्रशासन, होमगार्ड आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. 12 जणांपैकी 10 जणांना वाचवण्यात आलंय. मात्र दोन लहान मुलं अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
भिंडमधील नयागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेहंगूर येथे ही घटना घडली. हिलगाव गावातील काही लोक बोटीने सिंध नदी पार करून भंडारा खाण्यासाठी तेहंगूरला आले. परत येताना सिंध नदीत त्यांची बोट उलटली. अपघाताच्या वेळी बोटीत 10 जण असल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी आठ जणांची गावकऱ्यांनी सुखरूप सुटका केली, याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश खुरपुसे यांनी दुजोरा दिला आहे.
बोट बुडाल्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बोट बुडाल्यानंतर पाण्यात उतरलेल्या लोकांना त्यांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. हे पाहून घटनास्थळी उपस्थित अनेक ग्रामस्थांनी नदीत उड्या मारून आठ जणांना वाचवले.
या घटनेत बोटीतील दोन मुले अद्याप बेपत्ता असल्याचे अतिरिक्त एसपी यांनी सांगितले. त्यापैकी एक 16 वर्षांचा तर दुसरा 13 वर्षांचा आहे. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर नायगाव पोलीस ठाण्याचे पथक व रौण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे नदीत दोन्ही मुलांचा शोध सुरू करण्यात आला.