जळगाव | जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. पण आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ४२८ नवे बाधित आढळून आले आहे. तर आज ५२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
आज सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर भुसावळ, चोपडा, चाळीसगाव येथे आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 2984 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. तर आज एक कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात 131, जळगाव ग्रामीण 08 , भुसावळ 50, अमळनेर 41 , चोपडा 80 , पाचोरा 1 , धरणगाव 3 , यावल 12, रावेर 2 , पारोळा 3, चाळीसगाव 51, बोदवड 31, आणि इतर जिल्ह्यातील 2 .