जळगाव – चोपडा तालुक्यातील इचगाव शिवारात शेत रोटर करीत असताना बांधावरून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दाबल्या जाऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज येथे घडली . किनगाव येथील रहिवाशी प्रमोद देवराम तायडे वय ४५ असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी कि, प्रमोद तायडे हे इचखेडा येथील आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९-४७१९ ने शेतात रोटर करीत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन यात प्रमोद तायडे हे दाबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला . त्यांचा लहान भाऊ हा ट्रॅक्टर चालवीत असतो मात्र त्याला न पाठविता ते स्वतः गेल्याने हि दुर्दैवी घटना घडली . त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,एक मुलगी ,भाऊ असा परिवार आहे.