मुंबई | गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्याच दरम्यान संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारी वरून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरून फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत हे नटसम्राट आहेत अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊत याना नटसम्राट मध्ये भूमिका द्यायला हवी. सकाळी वेगळं बोलायचं , दुपारी वेगळं बोलायचं अशी त्यांची भूमिका असते. हे तेच संजय राऊत आहेत जेव्हा मनोहर भाई यांनी आजारी असताना नाकामध्ये नळी असताना विधानसभेत बजेट मांडले तेव्हा टीका करणारे आणि शिव्यांची लाखोली वाहणारे हेच संजय राऊत आहेत असे फडणवीसांनी म्हंटल.
हे देखील वाचा :
मध्य रेल्वेत 2422 जागांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
धक्कादायक ! दिराने केला वहिनीचा बलात्कार
अरे बापरे.. दारूच्या नशेत बकऱ्याऐवजी पकडलेल्या व्यक्तीची कापली मान
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो लक्ष द्या, 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटबाबत ‘हे’ नियम लागू होणार
संजय राऊत आता मगरीचे अश्रू पुसण्याचे काम करत आहेत. मनोहर भाई जिवंत असताना तुमची भूमिका काय होती हे गोव्याने देखील पाहिले आणि देशाने सुद्धा पहिले आहे त्यामुळे संजय राऊत यांनी नटसम्राटा सारखी भूमिका घेणं बंद करावं असा पलटवार फडणवीसांनी केला