साऊथ सुपरस्टार धनुष ने ट्विट करून आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या सोबत सुरु असलेल्या अठरा वर्षाचा संसार काडीमोड केला असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 18 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे धनुषच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.दोघांनी वेगळं होण्याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.ऐश्वर्या आणि धनुष यांनी 2004 साली लग्न केलं होतं आणि त्यांना 2 मुले आहेत. धनुषने घटस्फोटाचा निर्णय ट्विटरद्वारे जनतेला कळवला आहे.
रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि कमल हासन यांची मुलगी श्रृती हासन या दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहे. ऐश्वर्या या दिग्दर्शित करत असलेल्या ‘तीन’ चित्रपटासाठी त्यांनी श्रृतीला मुख्य अभिनेत्री म्हणून काम करावे असा आग्रह केला होता. मैत्रिणीच्या विनंतीला मान देत श्रृतीने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. या चित्रपटामध्ये धनुष हा प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान धनुष आणि श्रृती यांच्यात प्रेमांकुर फुलले अशा चर्चा होत्या.
???????????????????? pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
अभिनेता धनुष आणि अभिनेत्री श्रृती हासन या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या काही वर्षांपूर्वी जोरदार वावड्या उठायला लागल्या होत्या. दरम्यान या दोघांनी हा निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं, मात्र धनुष-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटानंतर काही चित्रपटप्रेमींना त्या अफवा खऱ्या असाव्यात असा संशय यायला लागला आहे.
हे सुद्धा वाचा…
BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करताय? तर जाणून घ्या ‘हे’ ५ प्लॅन्स; कमी किमतीत मिळेल अमर्यादित डेटा
पंतप्रधान मोदींना धमकी, कोणी दिली वाचा
रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी
याबाबत जेव्हा श्रृतीला प्रश्न विचारण्यात आले होते, तेव्हा तिने संतापून आपल्याला याबाबत लोकांना खुलासे करण्याची गरज नाहीये असंही तिने म्हटलं होतं. ‘सत्य जाणून घेण्यासाठी माझ्या पार्श्वभागात चिप बसवून, मी कुठे जातेय हे जाणून घेण्यासाठी माझा पाठलाग करावा असं मी लोकांना अजिबात सांगणार नाही’ असं विधानही श्रृतीने त्यावेळी केलं होतं. या सगळ्या अफवांचा धनुष आणि ऐश्वर्या यांच्या वैवाहीक आयुष्यावर ओरखडाही पडला नव्हता.