बोदवड | बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात चार जागांसाठी उद्या मतदान होत आहे. त्यापूर्वी भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड गुफ्तगू चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे परिसरात याची एकच चर्चा सुरू झाली आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या दरम्यान माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुध्द चांगलेच रंगले होते. यात नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांची शहरात एकमेकांच्या समोर झालेली सभा प्रचंड गाजली होती. यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. यात आ. गिरीश महाजन यांनी बोलण्याच्या ओघात खडसे यांनी खूप प्रयत्न करून देखील आमचे चंद्रकांत पाटील हे जिंकल्याचे नमूद केले होते. यातील आमचे या शब्दावरून निवडणुकीच्या रणांगणात बर्याच काथ्याकुट करण्यात आला.
हे देखील वाचा :
पंतप्रधान मोदींना धमकी, कोणी दिली वाचा
पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून नवीन कार्यक्रम जारी
आमदार नितेश राणेंना हायकोर्टाचा मोठा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो लक्ष द्या, 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटबाबत ‘हे’ नियम लागू होणार
उद्या मंगळवारी बोदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आ. गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंतराव कुलकर्णी यांच्या घरी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीबाबत गुफ्तगू केले. यातील तपशील समोर आला नसला तरी ऐन मतदानाच्या आधी या दोन्ही नेत्यांमधील झालेली भेट ही निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते असे जाणकारांचे मत आहे.