नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली आहे. पंजाबमध्ये आता २० फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी या निवडणुका १४ फेब्रुवारीला होणार होत्या. आज झालेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.
मतमोजणीच्या तारखेत कोणताही बदल झालेला नाही. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उर्वरित चार राज्यांच्या निवडणुकांचे निकालही याच दिवशी येतील. 13 जानेवारी रोजी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी निवडणूक आयोगाला मतदानाची तारीख सहा दिवसांनी वाढवण्याची विनंती केली होती.
हे देखील वाचा :
पंतप्रधान मोदींना धमकी, कोणी दिली वाचा
खुशखबर.. ‘या’ तारखेपासून सुरू होऊ शकते 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो लक्ष द्या, 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटबाबत ‘हे’ नियम लागू होणार
वास्तविक १६ फेब्रुवारीला गुरु रविदासांची जयंती आहे. त्यामुळे अनुसूचित जाती (एससी) समाजातील लोक या दिवशी बनारसला जाणार असल्याचे राजकीय पक्षांनी सांगितले. चन्नी यांच्याशिवाय भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल (युनायटेड) यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणुकीची तारीख वाढवण्याची विनंती केली होती.