पाचोरा ( प्रतिनिधी )- माजी आमदार दिलीप वाघ यांचे आदेशानुसार पाचोरा नगरपरिषद राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नगरसेवक कोट्यातुन बशिर बागवान यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. निकाली अर्जातून दि. २७ रोजी त्यांची स्विकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ व अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष बशिर बागवान यांची पालिका स्विकृत सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी न.पा.गटनेते संजय वाघ, पि.टी.सी. व्हाॅ. चेअरमन व्ही.टी.जोशी ,माजी नगरसेवक नाना देवरे, खलील देशमुख, शहराध्यक्ष सतीष चौधरी , अझहरखान , नगरसेवक विकास पाटील, भुषण वाघ, जारगांव माजी उपसरपंच रशिद मन्यार, सदस्य सचिन पाटील , महंमद ठेकेदार, हारून देशमुख, ,सत्तार पिंजारी , रज्जु बागवान ,सय्यद तारीक, सलीम खान, मोहसिन खान , कासम बेग, मोहम्मद लखारी , सलीम शाह , सुनिल शिंदे, अॅड. अविनाश सुतार, किशोर डोंगरे, अनिल पाटील, आदीसह रा.काँ. चे आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.