भुसावळ प्रतिनिधी | तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण भुसावळ विभागाने मध्य रेल्वेच्या मनमाड-नाशिकमार्गे जाणाऱ्या 18 गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आणि चाकरमान्यांचे हाल होऊ शकतात. या रद्द झालेल्या गाड्या कोणत्या आहेत, ते जाणून घ्या आणि तुमच्या प्रवासाची आखणी करता. अन्यथा हाल अटळ आहेत.
या गाड्या रद्द…
सध्या नांदगाव रेल्वेस्थानकात दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे या गाड्या रद्द केल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. त्यात 24 डिसेंबर, शुक्रवारी धावणारी हावडा-मुंबई (क्रमांक 12780), 26 डिसेंबर, रविवारी धावणारी मुंबई-हावडा (क्रमांक 12869) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी, 24 डिसेंबर रोजी धावणारी हालिया-कुर्ला (क्रमांक 12812), 26, 27 डिसेंबर रोजी अनुक्रमे रविवारी व सोमवारी धावणारी कुर्ला-हालिया (क्रमांक 12811) या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 28 डिसेंबर, मंगळवारी धावणारी पुरी-कुर्ला (क्रमांक 22866), 30 डिसेंबर, गुरुवारी धावणारी कुर्ला-पुरी (क्रमांक 22865) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. 23 व 27 डिसेंबर रोजी अनुक्रमे गुरुवार व सोमवारी धावणारी भुवनेश्वर-कुर्ला (क्रमांक 22865) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. 25 व 29 डिसेंबर रोजी अनुक्रमे शनिवार व बुधवारी धावणारी कुर्ला-भुवनेश्वर (क्रमांक 12879) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. या गाड्याच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक जरूर पहावे.