जळगाव,(प्रतिनिधी)-कन्नड घाटातून जाणार्या अवजड वाहनधारकांकडून वसुली प्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत आज दिनांक २७ रोजी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत.
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कन्नड घाटात अवजड वाहन चालकांकडून वसुली बाबत स्वतः वेशांतर करून ट्रक चालवत स्टींग ऑपरेशन करत वसुलीचा भंडाफोड केला होता. आमदार मंगेश चव्हाण यांनी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत कन्नड घाटात स्टींग ऑपरेशन केले. यात ते स्वत: ट्रक ड्रायव्हर बनले होते. तेव्हा त्यांच्याकडून पाचशे रूपयांची मागणी करण्यात आली. तसेच अन्य वाहनधारकांकडूनही याच प्रकारची वसुली करण्यात आल्याचे या स्टींगमधून दिसून आले होते. आमदारांनी याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती.
दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या प्रकरणी चौकशी करून यात दोषी आढळून आलेल्या गणेश वसंत पाटील, प्रकाश भगवान ठाकूर, सतीश नरसिंग राजपूत आणि संदीप भरत पाटील या चार पोलीस कर्मचार्यांना निलंबीत केले आहे.










