निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून
EPFO च्या या एका निर्णयामुळं लाखो पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे,सद्यस्थीत पेन्शनधारकांना आपली पेन्शन सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या बँकेत दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते,त्यास हयातीचा पुरावा म्हणतात.जीवन प्रमाणपत्र हा त्यांच्या हयातीचा पुरावा असतो, जो दरवर्षी बँक, पोस्ट ऑफिस किंवा वित्तीय संस्थेकडे जमा करावा लागतो. जेणेकरून पेन्शनधारकांची पेन्शन सुरू राहू शकेल.पेन्शन धारकांना हा दाखला देण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागत असल्याने सेवानिवृत्त वृद्ध पेन्शनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र EPFO च्या निर्णयाने पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय झाले बदल….
आता पेन्शनधारकांना घरबसल्याही जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला)सादर करता येणार असल्याची सुविधा बँका आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.तर आता जीवन प्रमाणपत्र कधीही सादर करता येणार आहे.
EPFO ने आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या नियमात मोठा दिलासा दिला आहे. कारण सद्य स्थितीला हा पुरावा दाखल करण्याचा एक अंतिम मुदत असते. परंतु आता नवीन नियमांनुसार, पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.त्याची वैधता जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी वैध असेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र 1 डिसेंबर 2021 रोजी सबमिट केले असेल तर त्याची वैधता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत असेल.
केंद्र सरकारच्या जीवन प्रमाण पोर्टलद्वारे तुम्ही डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करू शकता. जीवन प्रमाण वेबसाइट
https://jeevanpramaan.gov.in/ या संकेतस्थळाला ला भेट देऊन आधार आधारित प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार केले जाऊ शकते.
सरकारी बँका किंवा पोस्ट ऑफिसच्या डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे तुम्ही डिजिटल जीवन प्रमाणपत्र बुक करू शकता. पोस्टमन किंवा एजंटच्या घरी येण्यापूर्वी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, पेन्शन क्रमांक, पेन्शन खाते यासारखे तपशील तयार ठेवावे लागतील.
पेन्शनधारक सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग सेवेचा वापर करून इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) अंतर्गत डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
या बँकांमध्ये इंडियन बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा (बीओबी), बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया आदींचा समावेश आहे.