नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय तर दुसरीकडे केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं टेन्शन वाढलं आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मंगळवारी केरळमध्ये 4972 रुग्ण आढळले आहेत तर 370 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमधील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
केरळमध्ये मंगळवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार 4 हजार 972 रुग्ण समोर आले आहेत. तर, 370 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात समोर आलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. सोमवारी केरळमध्ये 3698 रुग्णसंख्या आढळून आले होते. तर, मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये आतापर्तंय 50 लाख 97 हजार 845 रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे.
सर्वाधिक रुग्णसंख्या तिरुअंनतपुरममध्ये
केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या तिरुअनंतपुरममध्ये आढळून आली आहे. मंगळवारी या जिल्ह्यात 927 , तर त्रिशुरमध्ये 619, कोझिकोडेमध्ये 527 रुग्ण आढळले आहेत.