संयुक्त राष्ट्रच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री ह्युस्टन येथे दाखल झाले आहेत. विमानतळावर ट्रेंड अँन्ड इंटरनॅशनल अफेयर्सचे संचालक क्रिस्टोफर ओल्सन आणि इतर अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. मोदींनी यावेळी अमेरिकेची एनर्जी सिटी म्हणून ओळख असलेल्या ह्युस्टनमध्ये उर्जा कंपन्यांच्या 17 सीईओंबरोबर बैठक केली.
भारतीय पेट्रोलियम कंपनी पेट्रोनेटने अमेरिकेची नैसर्गिक गॅस कंपनी टेल्युरियनबरोबर 50 लाख टन एलएनजी दरवर्षी आयात करण्याच्या करारावर देखील स्वाक्षरी केली. पेट्रोनेट ड्रिफ्टवूड होल्डिंगमध्ये गुंतवणूक करेल, ज्यामुळे पेट्रोनेटला प्रोजेक्टच्या पहिल्या अथवा दुसर्या टप्प्यात दरवर्षी 50 लाख टन एलएनजी खरेदी करण्याचा अधिकार असेल. टेल्युरियन आणि पेट्रोनेटच्या करारामधील देवाणघेवाण 31 मार्च 2020 पर्यंत पुर्ण होईल.