अहमदनगर,(प्रतिनिधी)- येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वार्डाला भीषण आग लागल्याची घटना आज दि.६ रोजी घडली असून या आगीत ५ ते ६ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील ५ ते ६ जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. तर १1 जण गंभीर असल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग इतकी भयानक होती संपूर्ण परिसर धुर आणि आगीने भडकलेले पाहायला मिळाले.