भुसावळ ( परशुराम बोंडे)– श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तर्फे स्व . बाबासाहेब के नारखेडे यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन वकृत्व व सुगमसंगीत स्पर्धा दिनांक २१ सप्टेंबर शनिवार रोजीआयोजित करण्यात आले आहे .
स्व. बाबासाहेब के नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा उद्घाटन सोहळा सकाळी 8 वाजता के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे होणार आहे . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ चेअरमन पी व्ही पाटिल , असून राज्यस्तरीय स्पर्धा उद्घाटक साहित्यिका श्रीमती सीमा भांरबे , प्रमुख अतिथी उपाध्यक्ष डॉ. संजीव नारखेडे, सेक्रेटरी डॉ. मकरंद नारखेडे,सदस्य डॉ किशोर नारखेडे , उपस्तित राहतील .या कार्यक्रमातर्गत
स्व . बाबासाहेब नारखेडे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध आंतरवर्गीय स्पर्धा ,2019 -बालवैद्यानिक स्पर्धा हस्तकला स्पर्धा आयटी सॉफ्ट फ्यूजन स्पर्धा , (elects vision )एलेक्ट्स विज़न स्पर्धा , पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा के उदघाटन सर्वश्री मिलिंद पी पाटिल , विजय जी भंगाळे, प्रमोद पी नेमाडे , विकास एस पाचपांडे , सिद्धश व्ही पाटिल , यांचे हस्ते होणार आहे .
बक्षिस वितरण समारंभ
स्व . बाबासाहेब के नारखेडे यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन वकृत्व व सुगमसंगीत स्पर्धा , शिक्षकांसाठी कथा व काव्यलेखन स्पर्धा, लेखकांसाठी कथासंग्रह , काव्यसंग्रह , व कादंबरी लेखन राज्यपुरस्कार , या स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ 21 रोजी दुपारी 2 .30 वाजता प्रभाकर हॉल येथे आयोजीत करण्यात आला आहे . अध्यक्षस्थानी श्रीनिवास एन नारखेडे, जळगाव पिपल्स को ऑप बँके चे चेअरमन भालचंद्र पाटिल , स्पर्धा प्रमुख सी बी जोगी , सौ के एस राणे, मुख्याध्यापक एन बी किरंगे , आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे . उपस्थितिचे आवाहन आयोजकांनी केले आहे .