Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा दंड भरावा लागेल ; जिल्हाधिकारी यांचे निर्देश

शासकीय/निमशासकीय कार्यालयांसह खाजगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागंतासाठी मास्क वापरणे बंधनकारक ; अन्यथा भरावा लागणार पाचशे रुपये दंड

najarkaid live by najarkaid live
October 29, 2021
in Uncategorized
0
मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा दंड भरावा लागेल ; जिल्हाधिकारी यांचे निर्देश
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 29 – कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे, नाट्यगृहे, बंदिस्त सभागृहे/मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रपटगृहे, अम्युझमेंट पार्क, इंडस्ट्रीज हे सुरु करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले असून त्यानुसार सुधारीत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील आदेश दिनांक 26 ऑक्टोबर, 2021 अन्वये “ब्रेक दि चेन” अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश लागू करण्यात आलेले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी/कर्मचारी व कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या सर्व अभ्यांगतांना कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक, तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख/आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतीम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा आरोग्य विभागात संपर्क साधून कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल, याची खातरजमा करावी.

सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजाच्या दरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशन करावे.

सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यांगतांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणारे अभ्यांगत/कर्मचारी/अधिकारी यांना संबंधित अभ्यांगत/कर्मचारी/अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात/आवारात विनामास्क आढळतील त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी) रक्कम रुपये 500/- प्रमाणे दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.

विनामास्क आढळणारे अभ्यांगत / कर्मचारी / अधिकारी यांना दंडाची आकारणी करुन सक्षम प्राधिकाऱ्याने पावती द्यावी व सदर दंडाची रक्कम कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडेस जमा करावी, आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा प्रकारे जमा झालेल्या दंडाची रक्कम महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा, 0070- इतर प्रशासकीय सेवा, 800 इतर जमा रक्कम या लेखाशिर्षाखाली शासनजमा करण्याची कार्यवाही करुन त्याबाबत आवश्यक ती नोंद आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंदवहीत घ्यावी.

या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्य्वस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदरनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : आधी पत्नीला केलं ठार, नंतर स्वताः उचललं हे टोकाचं पाऊल

Next Post

ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या पार्श्वभूमीवर ; ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us