भुसावळ : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या अर्ज छाननीत अर्ज बाद ठरलेल्या नऊ उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले हाेते. त्यात आठ जणांचे अपील अर्ज फेटाळले तर भुसावळचे नगरसेवक रवि सपकाळे यांचे बंधु महेंन्द्र सपकाळे यांचा एकमेव अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज बाद केल्याने त्यांच्या निर्णयाविराेधात उमेदवारांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले हाेते. या अपीलावर सुनावणी हाेवून २८ ऑक्टाेबर राेजी निर्णय देण्यात आला. या निर्णयात आठ जणांच्या अर्जावर खाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय पुढेही कायम ठेवून अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे त्यात माजी आमदार स्मिता वाघ, नाना पाटील, माधुरी अत्तरदे, दिलीप पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह आठ जण उमेदवारी रिंगणातून बाहेर झाले आहेत. तर महेंद्र सपकाळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला.