बेंगळुरू : साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. पुनीत 46 वर्षांचे होते. त्यांचा बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत त्याचा जीव वाचावा म्हणून डॉक्टर प्रयत्नांची पराकष्ठा करत होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुनीत राजकुमार हा 46 वर्षांचा होता. तो ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होता. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1985 मध्ये तो ‘बेट्टाडा होवू’ चित्रपटात दिसला होता. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. यासोबतच त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते. त्याच फिल्मसाठी त्यांची खूप वाहवा झाली होती. ‘सुवरत्थान’ या चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता.