Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात स्वच्छता मोहीम ; 1.5 टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

Editorial Team by Editorial Team
October 22, 2021
in जळगाव
0
जळगावात स्वच्छता मोहीम ; 1.5 टन कचऱ्याची लावली विल्हेवाट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आजादी का अमृत वर्ष साजरे करायचे निश्चित केले आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र व जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आज जळगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील 5 व्यापारी संकुलातील सिंगल युस प्लास्टिकचा 1.5 टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, मनपा उपआयुक्त शाम गोसावी, कवियत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकज ननावरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रासेयो जिल्हा नोडल अधिकारी डॉ. दिनेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर आदि उपस्थित होते.

सकाळी 7 वाजेपासून शहरातील महात्मा गांधी मार्केट, महात्मा फुले मार्केट, जुने बी.जे.मार्केट, नवीन बी.जे.मार्केट, गोलाणी मार्केटमध्ये कोरोना नियमांचे पालन करून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. स्वच्छता अभियानाचा समारोप गोलाणी व्यापारी संकुलात करण्यात आला.

या संस्थांनी घेतला सहभाग
स्वच्छता अभियानात जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव आकाशवाणी, रेडक्रॉस सोसायटी, सोशल लॅब, गोलाणी मार्केट सिंधी संगत आणि व्यापारी संघटना, मू.जे.महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, राष्ट्रीय सेवा योजना, नूतन मराठा महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

प्लॅस्टिकऐवजी पर्यायांचा उपयोग करा : महापौर जयश्री महाजन
प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक असल्याने नागरीकांनी प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा. आज जळगाव शहरातील व्यापारी संकुल स्वच्छतेसाठी युवकांनी पुढाकार घेतला ही चांगली बाब आहे. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक घडत आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या जल संवर्धन मोहिमेत देखील सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

सर्व तरुणांनी स्वच्छतादूत म्हणून पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
नेहरू युवा केंद्र, जळगाव स्वयंसेवक यांच्यामार्फत जिल्हाभरात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाची प्रशंसा करुन युवकांनी स्वच्छतादूत म्हणून पुढे येऊन कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. तसेच प्लॅस्टिक उपवास करण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासियांना केले.

गोलाणी मार्केट सिंधी संगत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जवाहरलाल ललवाणी, सचिव महेश चावला, गिरधर धाबी. मोहिमेसाठी चाय शायचे साहिल मनवाणी, दीपेश रुपानी आदींनी सहकार्य केले. यावेळी नेहरू युवा केंद्र युथ लीडर तेजस पाटील, पल्लवी तायडे, दुर्गेश आंबेकर, मुकेश भालेराव, नेहा पवार, परेश पवार, राहुल जाधव, सागर नगाने, शंकर पगारे, दीपक खिरोडकर, मनोज पाटील, कोमल महाजन, रवींद्र बोरसे, हिरालाल पाटील, उमेश पाटील, अनिल बाविस्कर, रोहन अवचारे, दिगंबर चौधरी या नेहरु युवा केंद्र तालुका समन्वयकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गिरीश पाटील, प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, आभार अजिंक्य गवळी यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आगीपासून वाचण्यासाठी खिडकीबाहेर आला, पण हात सुटला ; थराराक घटना कॅमेऱ्यात कैद

Next Post

देशात खाद्यतेल आणि डाळींच्या किंमती कमी होतील का? सरकारने दिले ‘हे’ उत्तर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

देशात खाद्यतेल आणि डाळींच्या किंमती कमी होतील का? सरकारने दिले 'हे' उत्तर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us