रावेर : तालुक्यातील रोझोदा येथे खेळता – खेळता गोबर गॅसच्या टाकीत पडल्याने सहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. परी पुष्कर फेगडे असे या बालिकेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ती गोबर गॅस टाकीजवळ खेळत होती.
खेळता – खेळता ती टाकीत पडली. त्यावेळी गल्लीत कुणीच नव्हते. सायंकाळी ती दिसत नसल्याने तिचा शोध घेतला असता ती टाकीत पडलेली आढळली. पण तोपर्यंतउशीर झाला होता. परी ही जे. टी. महाजन शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होती. परीचा मृतदेह पाहताच आई, वडील, भाऊ, आजी- आजोबा यांनी एक हंबरडा फोडला.