बोदवड प्रतिनिधी | बोदवड येथे शेतातील विहिरीत पडून दिव्यांग शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रदीप वसंत सोनोने (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत असे की, रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रदीप सोनोने हे बैलगाडी घेऊन शेतात गेले होते. ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत घरी न आले नाहीत. यामुळे कुटुंबातील स्वप्नील सोनोने आणि गणेश सोनोने हे प्रदीप यांचा शोध घेण्यासाठी शेजाऱ्यांसह शेतात गेले. यावेळी बैलजोडी शेतात मोकळी फिरताना अाढळली, तर गाडी विहिरीच्या कठड्याला धडकलेल्या अवस्थेत दिसून आली. मात्र, प्रदीप हे कुठेही दिसत नव्हते.
यामुळे त्यांच्या दोन्ही भावांसह शेजाऱ्यांनी शेतात व विहिरीजवळ सर्वत्र शोधाशोध केली. त्यात विहिरीत शोध घेताना प्रदीप बुडालेल्या स्थितीत सापडला. यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. गणेश सोनोने यांच्या खबरी वरून बोदवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास गजानन काळे करत आहेत.














