नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून थैमान घातलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येऊ लागली आहे. गेल्या 24 तासात देशात 13 हजार 596 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या 230 दिवसातील ही एका दिवसात सापडलेली सर्वात कमी कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या आहे. तर 166 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात देशात 19 हजार 582 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 40 लाख 81 हजार 315 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 39 हजार 331 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 52 हजार 290 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 89 हजार 694 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 97 कोटी 79 लाख 47 हजार 783 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.