चाळीसगाव ; २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे आज सकाळी घडली. रविंद्र अशोक गरूड (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील तरवाडे येथील रविंद्र अशोक गरूड (वय २३) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रविंद्र गरुड यास चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन सोनवणे हे करीत आहेत.