Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमरावतीच्या ३५ वर्षीय रूग्णाच्या मणक्यावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया

najarkaid by najarkaid
September 18, 2019
in जळगाव
0
अमरावतीच्या ३५ वर्षीय रूग्णाच्या मणक्यावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – अमरावती जिल्हयातील अंजनगाव सुर्जी येथील ३५ वर्षीय रूग्णाच्या फ्रॅक्चर झालेल्या मणक्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील अस्थिरोग तज्ञांच्या कुशलतेमुळे करण्यात आलेली स्पायनल फ्युजनची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. शस्त्रक्रियेनंतर रूग्ण आता पुर्वीप्रमाणे उभा राहु लागला आहे.
अमरावती जिल्हयातील अंजनगाव सुर्जी येथील अहमद खान (वय ३५) हे मोलमजूरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. एका दिवशी मजूरीसाठी गेलेल्या अहमद खान हे रेतीकाम करतांना बैलगाडीचा मागचा भाग पाठीवर पडल्याने  या अपघातात त्यांच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्यांना उठता देखील येत नव्हते. यावेळी इतर सहकार्‍यांनी त्यांना तातडीने स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी मात्र मोठा खर्च लागणार होता. अशा परीस्थीतीत त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी त्यांची तपासणी केली. या तपासणीत अहमद खान यांच्या डी-१२ मणक्याला फ्रॅक्चर झाले होते. डॉ. अग्रवाल यांनी खान यांच्या कुटूंबाची आर्थिक परीस्थीती लक्षात घेता त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती दिली. या योजनेंतर्गत अहमद खान यांच्या मणक्यात रॉड टाकून दाबले गेलेले हाड जोडण्यात आले. स्पायनल फ्युजन असे या शस्त्रक्रियेचे नाव असुन या शस्त्रक्रियेमुळे अहमद खान अवघ्या तीसर्‍याच दिवशी उठ-बस करू लागले. अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांचे कौशल्य आणि अनुभवामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.डॉ अग्रवाल यांना डॉ आशिष रत्नानी, भुलरोग तज्ञ डॉ शितल यांनी सहकार्य केले. तर डॉ राहूल कांबळे, डॉ कार्तीक कटेवार यांच्या मार्गदर्शनानुसार कामीनी परमार, सोनाली सावके, प्रियंका गावीत, देविका बांद्रे, शितल बावणे यांनी पुढील उपचार केले. तसेच योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. रूग्णाची प्रकृती आता झपाट्याने सुधारत आहे.
रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी देवासारखी मदतीला धावून आली —अहमद खान
माझे वडील अपंग असल्याने घरीच असतात मी मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो अशातच अपघातामूळे अपंगत्व आल्याने आम्ही खचलो होतो. पण गावातील लोक,डॉ उल्हास पाटील रूग्णालयातील डॉक्टर,कर्मचारी वर्ग देवासारखी मदतीला धावून आल्यामूळे मी पुर्वीसारखा काम करू शकेल.
अत्याधुनिक सुविधामूळे उपचार करणे शक्य झाले — डॉ दिपक अक्ष्रवाल
अहमद खान लवकरात लवकर रूग्णालयात आला. रूग्णालयात एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने ही स्पायनल फ्युजन शस्त्रक्रिया करणे शक्य झाली असल्याचे डॉ दिपक अग्रवाल यांनी सांगीतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरणाचे व आपलेही फायदे : विजयकुमार मुंडे

Next Post

नेरी दिगर येथे  ५० लाख  रुपयांचे विविध विकास कामाचे भुमीपुजन

Related Posts

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
नेरी दिगर येथे  ५० लाख  रुपयांचे विविध विकास कामाचे भुमीपुजन

नेरी दिगर येथे  ५० लाख  रुपयांचे विविध विकास कामाचे भुमीपुजन

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us