मुंबई: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेले उमदेवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करु शकतात. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचणं आवश्यक आहे. मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
कोणत्या पदांसाठी भरती
मुंबई महापालिकेत कंत्राटी तत्वावर समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे
पात्रता
समाज विकास अधिकारी पदासाठी उमेदवार समाजकार्य अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य अभ्यासक्रमाची पदवी घेतेलेली असणं आवश्यक आहे.
सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी देखील समाज कार्य पदवी अभ्यासक्रमाची पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 20 वर्षांहून अधिक काळ अनुभव असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
समाज विकास अधिकारी – 65 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी.
सहाय्यक समाज विकास अधिकारी – 65 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी.
इतका मिळणार पगार
समाज विकास अधिकारी – 45,000/- रुपये प्रतिमहिना
सहाय्यक समाज विकास अधिकारी – 35,000/- रुपये प्रतिमहिना
महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांनी आपला अर्ज फुलस्केप कागदावर आपली संपूर्ण माहिती भरून पाठवावा. यावर आपलं नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव या सर्व गोष्टी टायपिंग फॉरमॅटमध्ये लिहाव्यात. यासह शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं जोडावीत. यानंतर संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सहायक आयुक्त (मालमत्ता) कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा