Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात मुकुंद अण्णा बिलदीकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे शिवसंवाद अभियान

प्रभाग निहाय घेणार समस्यांचा आढावा

najarkaid by najarkaid
October 6, 2021
in Uncategorized
0
पाचोऱ्यात मुकुंद अण्णा बिलदीकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे शिवसंवाद अभियान
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर)दि,६- पाचोरा नगरपालिकेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी हजारो कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत तर अनेक कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत मात्र तरी देखील नागरिकांच्या काही समस्या बाकी राहत असतील तर त्या सोडवणुकीच्या दृष्टीने जनतेशी हितगुज करता यावे, विचारांचे आदानप्रदान व्हावे या प्रांजळ हेतूने शहर शिवसेनेच्या वतीने संपूर्ण पाचोरा शहरात प्रभागनिहाय शिवसंवाद अभियानाची सुरुवात करण्यात आली या अभियानाचे नेतृत्व मुकुंद अण्णा बिलदीकर हे करणार असून त्याअंतर्गत प्रभाग एक व दोन येथे पालिका अंतर्गत कामांशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवारी संध्याकाळी आ.किशोर अप्पा पाटील यांचे अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांशी संवाद झाला यावेळी मंचावर मुकुंद अण्णा बिलदीकर,शहर प्रमुख किशोर बारावकर, मनोज शांताराम पाटील, प्रवीण ब्राह्मणे, जगन निकम, शांताराम खैरे आदींची उपस्थिती होती.यावेळी जगन निकम यांचेसह अनेकांनी आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास करत हातावर शिवबंधन बांधत भगवा गळ्यात टाकला. यावेळी प्रभागातील सर्वांगीण विकास कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिल्लक राहिलेले कामे त्वरित पूर्ण करावीत अशी मागणी करण्यात आली यावेळी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या भाषणातून शिरपूर प्रमाणे पाचोरा पॅटर्न यापुढे राज्यात चर्चेत येईल अशा पद्धतीने विकास कामांचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले.

मंगळवारी प्रभाग क्रमांक दोन मध्ये मुकुंद अण्णा बिलदीकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली. संध्याकाळी बैठक संपन्न झाली यावेळी प्रभाग दोन मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन समस्यांचा पाढा वाचला, शिवसेनेच्या वतीने या सर्व समस्या लिहून घेण्यात आल्या यावेळी बोलतांना मुकुंद बिलदीकर यांनी आमदार किशोर अप्पा पाटील व नगरपालिकेच्यावतीने प्रभागासाठी करण्यात आलेल्या कामांवर प्रकाश टाकत सर्व मुस्लिम बांधव आ.किशोर अप्पा पाटील व शिवसेनेच्या कायम पाठीशी असल्याने आपल्या बांधवांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर आगामी पंधरा दिवसात तोडगा काढून समस्या सोडविणार असल्याचे शब्द दिला.यावेळी माजी जेष्ठ नगरसेवक रसूल उस्मान,शहर प्रमुख किशोर बारावकर,लतीफ खान,माजी नगरसेवकअय्युब बागवान, डॉ.भरत पाटील, शाकिर बागवान ,जावेद शेख,प्रवीण ब्राम्हणे सलीम शेख,युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील यांचेसह परिसरातील तरुण व नागरिकांची मोठी गर्दी होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन साजिद कुरेशी यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : आणखी एका एसटी चालकाने घेतला बसमध्येच गळफास

Next Post

अंडी विकून महिन्याला कमवाल लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
अंडी विकून महिन्याला कमवाल लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

अंडी विकून महिन्याला कमवाल लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us