धरणगाव – परिसरातले श्रद्धास्थान असलेल्या श्री बालाजी मंदिर सभागृह व भक्तनिवासाचे भूमिपूजन कार्यक्रम दि.14 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे.
भूमिपूजन ना.जयकुमार रावल (पर्यटन विकास मंत्री महाराष्ट्र) यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ना.गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री महाराष्ट्र) हे भुषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून सौ.अंजली भानुदास विसावे (प्रभारी नगराध्यक्ष धरणगाव नगरपालिका), सर्व नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन असे आवाहन श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ धरणगावचे अध्यक्ष डी.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सचिव राजेंद्र पवार यांनी केले आहे.