जळगाव – जळगाव खुर्द येथील ५७ वर्षीय रूग्णांच्या मेंदुच्या बाहेरील अर्धा किलो वजनाच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील तज्ञ शल्यचिकीत्सकांच्या टीमला यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव खुर्द येथील रहीवासी असलेल्या ५७ वर्षीय प्रल्हाद पाटील यांना अनेक वर्षापासून मेंदुच्या बाहेरून गाठ होती. सुरूवातीला लहान असलेली ही गाठ हळुहळु वाढत गेल्याने कुटुंब चिंतीत होते. अनेक उपचाराअंती यश येत नव्हते. वाढत वाढत ही गाठ अर्धा किलोची झाली होती आणि एके दिवशी वेदना असह्य होउ लागल्याने त्यांना जवळच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी शल्यचिकीत्सक डॉ. चैत्यन्य पाटील यांनी तपासणी केली व गाठ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.रूग्णास मधुमेह,हदयविकार तसेच दोन्ही किडनी काम करणे कमी झाल्याने या शस्त्रकियेला धोका होता. तसेच शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थीती बेताचीच होती. मात्र डॉ. चैत्यन्य व रूग्णमित्रांनी कागदपत्राची जूळवाजूळव करून त्यांच्या उपचारासंबंधीचे प्रकरण महात्मा फुले योजनेंतर्गत टाकले व मंजूरी मिळाल्यानंतर ताबडतोब रिसेक्शन ऑफ टयुमरची यशस्वी शस्त्रक्रिया करत गाठ काढली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. चैत्यन्य यांना भूलरोग तज्ञ डॉ. शितल ढाके, डॉ. अविनाश बेडेकर, डॉ तन्मयी पागे, आयसीयुमधील सहाय्यक शालीक चौधरी, राहूल बर्हाटेे व परीचारीका विभागाने सहकार्य केले.
सर्व सुविधा एकाच छताखाली असल्यामूळे शस्त्रक्रिया यशस्वी — डॉ. चैत्यन्य पाटील
प्रल्हाद पाटील यांना मधुमेह, हदयविकार आणि त्यातच दोन्ही किडणीनी काम करणे बंद केले होते. अशा वेळी फिजीशियन, कॉर्डीओलॉजीस्ट,भुलरोग तज्ञ यांच्याबरोबर सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने अर्धा किलोची ही गाठ काढण्याचे आव्हान स्विकारता आले. फक्त ज्या भागात गाठ होती तेवढा भाग बधीर करून ही शस्त्रक्रिया केली. डॉ चैतन्य यांनी गेल्या दोन महिन्यात शस्त्रक्रिया अभियानातून लहान मोठे अशा जवळपास १२२ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहे.
रूग्णालय गोरगरीबांसाठी देवालय — नातेवाईकांची भावना
डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात दाखल केल्यानंतर आर्थिक अडचण न येउ देता येथील डॉक्टर व कर्मचार्यांनी केलेली सर्वोतपरी मदत ही लाखमोलाची ठरली आहे. स्वत: माजी खा.डॉ उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील यांनी देखिल जातीने लक्ष घातल्यामुळेच प्रल्हाद पाटील यांचा पुर्नजन्मच झाला. हे रूग्णालय सर्वसामान्य आणि गोर गरीबांसाठी देवालयच असल्याची भावना यावेळी नातेवाईकांनी बोलून दाखवली.