नवी दिल्ली : रेशन कार्ड हा एक दस्तऐवज आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला सरकारकडून मोफत रेशन मिळते. याद्वारे तुम्हाला फक्त स्वस्त किंमतीतील धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे रेशन कार्डचा उपयोग हा विविध कागदपत्र बनवण्यासाठीही केला जातो.
आता रेशनिंग हळूहळू ऑनलाईन होत आहे. यासाठी रेशन कार्डमध्ये योग्य मोबाईल नंबर नोंदविणे फार महत्वाचे आहे. जर तुमच्या रेशनकार्डमध्ये जुना किंवा चुकीचा नंबर असेल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जर तुमच्या रेशन कार्डवर चुकीचा नंबर असेल तर तो तुम्हाला सहजपणे घरबसल्या बदलता येतो. आज आम्ही तुम्हाला रेशन कार्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत.
असा बदला मोबाईल नंबर?
>>तुम्हाला प्रथम https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या साईटला भेट द्यावी लागेल.
>>तुमच्या समोर एक पान उघडेल.
>>येथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिलेला दिसेल.
>>आता तुम्हाला खाली दिलेल्या स्तंभात तुमची माहिती भरावी लागेल.
>>येथे पहिल्या स्तंभात तुम्हाला घराच्या प्रमुख/NFS ID चा आधार क्रमांक लिहावा लागेल.
>>दुसऱ्या स्तंभात रेशन कार्ड क्रमांक लिहावा लागेल.
>>कुटुंबप्रमुखांचे नाव तिसऱ्या स्तंभात लिहावे लागेल.
>>शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचा नवीन मोबाईल नंबर लिहावा लागेल.
>>आता Save वर क्लिक करा.
>>आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल.
>>रेशन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
देशभरात पसरलेले कोरोनाचे संकट पाहता केंद्र सरकारने गेल्या वर्षी रेशन कार्डला आधारशी जोडण्यास सुरुवात केली. केंद्रीय अन्न मंत्रालयाने सांगितले आहे की जे रेशन कार्ड आधारशी लिंक करत नाहीत, त्यांना रेशन मिळण्यात अडचण येईल.
एक देश एक कार्ड योजना
1 जून 2020 पासून रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू झाली आहे. या योजनेमध्ये तुम्ही कोणत्याही राज्यात राहून रेशन खरेदी करू शकता. याचा अर्थ तुम्हाला कुठेही खाद्यपदार्थांची काळजी करण्याची गरज नाही. ही योजना आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि दमण-दीव मध्ये आधीच लागू आहे.