नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. आज सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,948 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 219 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 43,903 रुग्ण कोरोनावर मात करुन कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. मंगळवारी 41965, बुधवारी 47092, गुरुवारी 45352, शुक्रवारी 42618, शनिवारी 42766 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 27 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 40 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 4 लाख 4 हजार 874 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.