मुंबई- बॉलिवूडची देशी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. प्रियांका तिच्या अनोख्या फॅशनसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. प्रियांकाचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, प्रियांका आणि निक जोनस यांच्या लग्नातील फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अशात प्रियांकाने केलेलं नवं फोटोशूटही सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय.
प्रियांका चोप्रा ही नुकतीच एका आंतरराष्ट्रीय दागिन्यांच्या ब्रॅण्डची ग्लोबल एम्बेसिडर झाली आहे. या ब्रॅण्डचं मंगळसूत्र घालून प्रियांकाने हटके फोटोशूट केलं आहे. परंतु, त्याची किंमत ऐकून चाहतेही अवाक झाले आहेत.
या फोटोशूटमधील काही फोटो प्रियांकाने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. प्रियांकाच्या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. या फोटोंमध्ये प्रियांकाने घातलेलं मंगळसूत्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे मंगळसूत्र चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलं आहे. परंतु, मंगळसूत्राची किंमत ऐकून चाहत्यांनी हात जोडले आहेत. फोटोंमध्ये प्रियांकाने घातलेल्या १८ कॅरेट मंगळसूत्राची किंमत ३ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे. मंगळसूत्राची किंमत वाचून नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहे.
प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ चित्रपटात आलिया भट आणि कतरिना कैफ सोबत दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय प्रियांका हॉलिवूड चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि मेट्रिक्स ४’ मधेही झळकणार आहेत.