रावेर,(प्रतिनिधी) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारणमंडळ ( महाराष्ट्र ) च्या वतीने आज नूतन तालुका कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य सल्लागार बी . आर . पाटील हे होते .
यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक नाना शंकर पाटील ( जिल्हाध्यक्ष निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ) मा . सुरेंद्र पाटील ( राज्य सल्लागार ) मा . नितीन महाजन ( अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ रावेर लाभले . मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रथम वटवृक्ष रोपाचे पुजन करण्यान आले .
राज्य सल्लागार बी . आर . पाटील जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांच्या मार्गदर्शना खाली रावेर तालुका नूतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली व नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले . तालुका अध्यक्ष पदी गिरीष भंगाळे रोझोदा . तर रावेर तालुका कार्याध्यक्षपदी – श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे येथील कलाशिक्षक श्री अर्जुन सोळुंके यांची नियुक्ती करण्यात आली . उपाध्यक्ष सैयद वसीम अयुब खानापूर , उपाध्यक्ष सौ . अर्चना महाजन चिनावल , सचिव कपिल धांडे रोझोदा, खजिनदार काशिनाथ धांडे खानापूर , संघटक नितीन भोगे निंभोरा , कायदेशीर सल्लागार ॲड निलेश महाजन सावखेड, ॲड सुधीर धांडे रोझोदा , सल्लागार नंदकिशोर पाटील सावदा , रावेर शहर अध्यक्ष सबॉजखाँ तडवी रावेर , सदस्य अमोल राणे सावदा , प्रकाश महाजन सिंगनूर , संदीप महाजन वाघोदा , महम्मद तडवी रावेर , सौ रुपाली नेमाडे चिनावल , अशा प्रकारे तालुका कार्यकारणी जाहिर करण्यान आली प्रसंगी प्रमुख पाहूण्याच्या हस्ते सौभाग्य नगर परिसरात वटवृक्ष , कडूलिंब , आवडा , शिसम , बहाव , पिंपड , अशा एकून पंचवीस वृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली .
तसेच अधंत्वनिवारण संशोधनासाठी व नेत्ररोग निवारणासाठी नेत्रदान संकल्प करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीष भंगाळे यांनी केले .सुत्रसंचालन अर्जुन सोळुंके यांनी केले तर आभार कपिल धांडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन नेमाडे , रमेश राठोड , एस बी राणे , सौ रजंना सोळुंके , पंकज पाटील , सुयोग पाटील , राहुल पाटील , समाधान बोरसे , वरद नेमाडे , विपूल सोळुंके यांनी परिश्रम घेतले .