भुसावळ : शहरातील जुना सातारा, कोळी वाडा भागातील 24 वर्षीय तरुणाने तापी पात्रात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. धनंजय सुनील आंबोळकर (24) असे मयताचे नाव आहे.
दरम्यान, एका तरुणाने तापी पात्रात उडी घेतल्याची माहिती शहर पोलिसांना कळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेत पोहणार्यांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. माजी नगरसेवक भीमराज कोळी, युवराज पाटील यांच्यासह परीसरातील नागरीकांनी तापी नदीवर धाव घेतल्यानंतर मयताची ओळख पटवली.
भुसावळ पालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात मोठा भाऊ, आई-वडील असा परीवार आहे. या घटनेने जुना सातारा, कोळी वाडा भागात हळहळ व्यक्त करण्यात आली.