केंद्रीय राखीव पोलीस दलात २४३९ पॅरामेडिकल स्टाफची भरती होणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १३ ते १५ सप्टेंबरमध्ये यासाठी थेट मुलाखती होणार आहेत.
सीआरपीएफने निर्धारित केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सीएपीएफ आणि सशस्त्र दलांचे सेवानिवृत्त पुरुष आणि महिला कर्मचारी या वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात.
पॅरामेडिकल स्टाफ भरतीसाठी सीआरपीएफने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, ६२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सीएपीएफ आणि एआरमध्ये पॅरामेडिकल कॅडर ड्युटीसाठी एक वर्षासाठी तैनात केले जाणार आहे. पात्रता निकषांविषयी अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा